केंद्राने दहशतवाद्यांची मागणी धुडकावली होती-दिग्विजयसिंह

December 28, 2008 5:54 PM0 commentsViews: 7

28 डिसेंबर इंदूरमुंबईवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांनी भारतीय तुरुंगात असलेल्या आपल्या काही साथीदारांना सोडण्याची मागणी केली होती असा दावा काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी केला आहे. पण केंद्रातल्या युपीए सरकारने ही मागणी धुडकावून लावली असंही ते म्हणाले. इंदूर इथं बोलताना त्यांनी असा खुलासा केला आहे.मात्र महाराष्ट्राचे गृहमंत्री जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचं सांगितलं.भारत आणि पाक यांच्यात युद्धाची शक्यता वर्तवली जात असताना हे वक्तव्य केलं जातं असल्यामुळे दिग्विजयसिंह यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. याआधी अंतुलेंच्या वक्तव्यामुळे काँग्रेस अडचणीत आली होती. मात्र दिग्विजयसिंह यांचा हा दाव्यात राजकीय खेळी दिसून येत आहे. आणि टार्गेट अर्थात भा.ज.प.आहे. कारण कंधहार अपहरणावेळी अतिरेक्यांना सोडल्याचा डाग त्यांच्या माथी लागला आहे.नुकत्याच झालेल्या दहशतवादविरोधी चर्चेदरम्यान, दहशतवादविरोधी नवा कायदा आणण्यात सरकार उशीर करत असल्याचा आरोप भा.ज.प.नं केला होता.दहशतवादाच्या मुद्यावर भा.ज.प. काँग्रेसला नेहमीच कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात असतो.पण अतिरेक्यांच्या दबावाला काँग्रेस बळी पडली नाही हे दिग्विजयसिंह यांच्या वक्तव्यामुळे दिसून येतं.

close