ठाणे बंदला हिंसक वळण, ठाणेकरांचे हाल

April 18, 2013 9:38 AM0 commentsViews: 7

18 एप्रिल

ठाणे : अनधिकृत बांधकांमाच्या कारवाईविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि शिवसेनेनं ठाणे बंद पुकारलाय. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. दरम्यान या बंदला हिंसक वळण लागलंय. मनसेनं परिवहन व्यवस्थापकाच्या कार्यालयात तोडफोड केली. बंदमुळे आज ठाण्यात रिक्षा बंद आहेत तसंच टीएमटीच्या बसेसही तुरळक धावतायेत. टीएमटीच्या बसेस जास्त सोडाव्यात या मागणीसाठी मनसेनं परिवहन व्यवस्थापकाच्या कार्यालयात तोडफोड केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारलेल्या आजच्या बंदमध्ये मनसे सहभागी नाही. सर्वसामान्यांना वेठीस धरू नका, असं म्हणत मनसेनं ही तोडफोड केलीे.

आजच्या बंदमुळे सकाळपासूनच सगळी दुकानं बंद आहेत. रस्त्यांवर ठाणे परिवहन सेवा अर्थात टीएमटीच्या बसेसही अगदी कमी धावत आहे. मात्र रिक्षा पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे नोकरदार ठाणेकरांचे घराबाहेर पडून रेल्वे स्टेशनवर येईपर्यंत अतोनात हाल होत आहे. एस टी परिवहन मंडळाच्या बसेस आणि खासगी बसेससाठी त्यामुळे भरपूर गर्दी रिक्षा आणि बसेसमुळे एरवी ट्रॅफिक जॅम असलेले ठाण्यातले रस्ते आज मात्र बर्‍यापैकी रिकामे दिसत आहे. दरम्यान, काल रात्री टीएमटीच्या 10 बसेसची हवा काढण्यात आलीये आणि 3 बस तसंच 5 रिक्षांचीदेखील कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली आहे. या बंदमधून मनसे आणि भाजपने विरोध दर्शवत बाहेर पडले आहे.

close