संजय दत्तपाठोपाठ झैबुन्निसासह 6 जणांना मुदवाढ

April 18, 2013 9:53 AM0 commentsViews: 4

18 एप्रिल

1993च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी झैबुन्निसा काझी आणि इतर 6 दोषींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यांना शरण येण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 4 आठवड्यांची मुदतवाढ दिलीय. अल्ताफ अली सईद, इसा मेमन, युसूफ नळवाला, के. सी. अडजानिया, अब्दुल गफूर पारकर आणि ईशाद मोहम्मद हजवणे यांना ही मुदतवाढ मिळालीय. मात्र, शिक्षा सुनावलेल्या 38 पैकी दोघं आज कोर्टात शरण आले नाहीत. मनोज कुमार गुप्ता आणि रणजीत सिंग अशी या दोघांची नावं आहेत. रणजीत सिंग हे माजी कस्टम्स अधिकारी आहेत. दरम्यान, सीबीआयचे वकील दीपक साळवे यांनी या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात येणार असल्याचं सांगितलंय.

close