अमेरिकेने दिलेले पुरावे पाकनं नाकारले

December 29, 2008 4:09 AM0 commentsViews: 2

29 डिसेंबर, इस्लामाबादमुंबई हल्ल्याबाबत अमेरिका आणि ब्रिटननं पुरवलेले पुरावे पाकिस्ताननं फेटाळून लावले आहेत. यात भारतानं हल्ल्याबाबत दिलेल्या माहितीचा समावेश आहे. तसंच अमेरिका आणि ब्रिटननं इतर सूत्रांकडून मिळवलेली माहितीही त्यात आहे. चौकशीदरम्यान अजमल कसाबनं दिलेल्या कबुलीचा पुराव्यात समावेश आहे. अतिरेक्यांच्या मोबाईल संभाषणाचा तपशील आणि झक्वीर रहमान लख्वीबरोबरचं संभाषणही त्यात आहे. पण पाकिस्ताननं हे पुरावे मानायला नकार दिलाय. हे पुरावे कोर्टात सिद्ध होणार नसल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. भारतीय लोकांच्या साक्षी आणि त्यांचे जबाब तसंच कॉम्प्युटर ड्राईव्ह आणि अतिरेक्यांकडून जप्त केलेल्या मोबाईल्सची माहिती द्यावी, अशी मागणी पाकिस्ताननं केली आहे. 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर पाकिस्तानवरचा आंतरराष्ट्रीय वाढला होता. त्यामुळे दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिले होते. मात्र काही दिवसातच पाकिस्तानचे पोकळ दावे, भारतावरच केलेला दहशतवादाचा आरोप आणि वारंवार केलेली युद्धाची भाषा यामुळे पाकिस्तानचे खरे स्वरूप उघडे पडले. आता अमेरिका आणि ब्रिटनला त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानचं खरं रूप दिसून आलं आहे.

close