‘गोल्डन गर्ल’ राहीला 1 कोटीचे बक्षीस !

April 18, 2013 1:16 PM0 commentsViews: 12

18 एप्रिल

मुंबई: नेमबाजीत 25 मीटर पिस्तूल क्रीडा प्रकारात जगजेतेपद पटावणार्‍या महाराष्ट्राच्या राही सरनौबतला महाराष्ट्र सरकारकडून तब्बल एक कोटी रुपये देऊन गौरवलं जाणार आहे. तर सरकारी नोकरीतही क्लास वन अधिकार्‍याचं पद देण्याचा प्रस्ताव पारित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानपरिषदेत केली. 25 मीटर पिस्तूल प्रकारात वर्ल्ड चॅम्पियन होणारी राही पहिली भारतीय खेळाडू ठरली. यापुर्वी वर्ल्डकप जिंकणार्‍या महाराष्ट्राच्या 3 महिला कबड्डीपटूंना महाराष्ट्र सरकारनं प्रत्येकी 1 कोटी रुपये देऊन गौरवले होते. याच निकषावर राहीचाही यथोचित सन्मान करण्यासाठी क्रीडा संचलनयाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.

राहीची कामगिरी

2008 – युथ कॉमनवेल्थ गेम्स – गोल्ड मेडल2010 – कॉमनवेल्थ गेम्स – (वैयक्तिक प्रकार) – सिल्व्हर मेडल2010 – कॉमनवेल्थ गेम्स – (टीम प्रकार) – गोल्ड मेडल 2011 – वर्ल्ड कप (अमेरिका) – ब्राँझ मेडल2012 – लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व2013 – वर्ल्ड कप (कोरिया) – गोल्ड मेडल

close