कॅगने ओढले जलसंपदा,अर्थ खात्यावर कडक ताशेरे

April 18, 2013 1:56 PM0 commentsViews: 57

18 एप्रिल

नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) चा अहवाल आज विधिमंडळात सादर झाला. या अहवालात अर्थखातं आणि जलसंपदा खात्याच्या बेशिस्तीवर कडक ताशेरे कॅगनं ओढले आहेत. जलसंपदा खात्यातल्या उधळपट्टीवर आणि प्रकल्पांच्या विलंबावर कॅगनं गंभीर ताशेरे ओढले आहेत. पाटबंधारे प्रकल्पांच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढवल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दोन दिवसांत निधी खर्च केल्याबद्दल अर्थखात्यावर टीका करण्यात आलीय. सरकारच्या या सवयीमुळे 2012 मध्ये 21 हजार 155 कोटी रुपयांचा निधी शेवटपर्यंत खर्चच झाला नाही. त्यामुळे खर्च न झालेले 25 हजार 298 कोटी रुपये शेवटच्या दोन दिवसांत वर्ग करण्यात आले. ही रक्कम वेळेत खर्च केली असती, तर इतर विकासकामं मार्गी लागली असतंी, असं कॅगनं म्हटलंय. अर्थ आणि नियोजन विभागाच्या कार्यपद्धतीत दोष आहेत आणि त्यामुळे अनेक विकासकामांवर परिणाम झाल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय.

कॅगचे पाटबंधारे विभागावर ताशेरे – प्रकल्पाच्या किंमती वाढल्या, पण 426 प्रकल्प अपूर्णच- 5 पाटबंधारे विकास महामंडाळांतर्गत 426 प्रकल्प 40 वर्षांपासून अपूर्ण- 426 पैकी 242 प्रकल्पांचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढला- खर्च 7 हजार 215 कोटींवरून 33 हजार 832 कोटींवर गेला- कुकडी हा राज्यातला सर्वाधिक काळ रखडलेला प्रकल्प- सिंचनामध्ये असमान निधीवाटप – विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे 98 प्रकल्प रखडले- तापी पाटबंधारे महामंडळाचे 27 प्रकल्प रखडले

close