प्राध्यापकांचा बहिष्कार मागे ?

April 19, 2013 9:43 AM0 commentsViews: 39

19 एप्रिल

मुंबई : गेले 75 दिवस सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या बहिष्कारावर आज तोडगा निघणार आहे. राज्य सरकार आणि प्राध्यापकांच्या संघटनांमधली कोंडी अखेर फुटली आहे. याआधी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलेली शिष्टाई देखील संपावर उतारा देण्यात अपयशी ठरली होती. कारण राज्य सरकार एम.फुक्टोला कोणताही निर्णय लेखी स्वरूपात कळवत नव्हते. आता मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सरकारला अखेर जाग आलीय. आज 4 वाजता उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी प्राध्यापकांच्या संघटनांची बैठक होणार आहे. प्राध्यापकांच्या थकीत वेतनासाठी 1,500 कोटींची घोषणा सरकारने केली आहे. मात्र सरकारने लेखी स्वरूपात जोपर्यंत आश्वासन देत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय प्राध्यापकांनी घेतला आहे. तब्बल 75 दिवस सुरू असलेल्या संपामुळे राज्यभरातील विद्यापीठात होणार्‍या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. प्राध्यापकांच्या आडमुठ्या धोरणामुळे मात्र विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अखेरीस आज राजेश टोपे यांच्यासोबत प्राध्यापकांची बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय तडजोड होतेय याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.

close