जेट आणि किंगफिशर एअरलाईन्सच्या दरात कपात

December 29, 2008 4:43 AM0 commentsViews: 2

29 डिसेंबरजेट आणि किंगफिशर एअरलाईन्सनी आपल्या तिकीटदरात कपात करत केली आहे. इंधनाचे दर कमी झाल्यानं ही कपात झाली आहे. जेट एअरवेज आजपासूनच आपल्या तिकीटदरात कपात करणार आहे तर किंगफिशर एक जानेवारीपासून आपले तिकीट दर कमी करेल. नवीन दरानुसार जेटचे तिकीट दर 15 ते 40 टक्क्यांनी कमी होणार आहेत. ही दरकपात जेटच्या सर्व घरगुती फ्लाईटस् ना लागू असेल अशी माहिती, जेटच्या प्रवक्त्यानं दिली. मात्र किंगफिशरने आपल्या तिकीट दरात नेमकी किती कपात करणार आहे हे स्पष्ट केलं नाही. इंधन दरातील कपातीचा फायदा विमान कंपन्यांनी प्रवाशांनाही द्यावा असं नागरी हवाई उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी विमानकंपन्यांना सांगितलं होतं. तसंच गेल्या काही दिवसात जागतिक मंदीचा विमानकंपन्यांना मोठा फटका बसला आहे. त्या पार्शव्भूमीवर ही कपात केल्याचं मानलं जात आहे.

close