दूषित पाण्यानं अख्खं गावच पडलं आजारी

April 19, 2013 4:59 PM0 commentsViews: 36

19 एप्रिल

औरंगाबाद : राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस आणखी तीव्र होत आहे. मराठवाड्यातल्या दुष्काळी भागात लोकांनी वणवण करावी लागतेय. त्यातच आता दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळं नागरीकांचं आरोग्य धोक्यात आलंय. पैठण तालुक्यातल्या बिडकीनमध्ये दूषित पाणी प्यायल्यानं अख्खं गावंच आजारी पडलंय. विशेष म्हणजे आजारी लोकांवर ग्रामीण रुग्णालयात जुजबी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलंय. काही रूग्णावर राहत्या घरीच उपचार सुरू आहे. पण, बाधित लोक पुन्हा आजारी पडले आहेत. आम्ही रूग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता पण काही रूग्णांनी दाखल होण्यास नकार दिला. त्यांच्यावर योग्य ते उपचार करून त्यांनी घरी पाठवण्यात आले होते असा दावा डॉक्टरांनी केलाय. अगोदरच दुष्काळात होरपळणार्‍या लोकांना या दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय.

close