वाघाच्या रक्षणासाठी स्प्राउट्स ची मोहीम

December 29, 2008 2:30 PM0 commentsViews: 16

29 डिसेंबर, मुंबईउदय जाधव भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघांची संख्या, आता केवळ एक हजार चारशे अकरा इतकी उरली आहे. त्यामुळे भविष्यात वाघ फक्त चित्रांपुरताच उरण्याची भीती आहे. म्हणूनच स्प्राऊट्स या वन्यजीव संस्थेने नवीन राष्ट्रीय प्राणी कोण असावा ? यासाठी मतदान प्रक्रिया सुरू केली आहे. जेणे करुन वाघ वाचवण्यासाठी गंभीर पावले उचलली जातील.वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी. वाघाची कमी होणार्‍या संख्येमुळे त्याला वाचवण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता नवीन राष्ट्रीय प्राणी निवडण्याची गरज असल्याचे वन्यजीव संशोधक आनंद पेंढारकर यांनी सांगितलं. नवीन राष्ट्रीय प्राणी निवडण्यासाठी वन्यजीव संशोधकांनी मतदान करण्याचं आवाहन केलंय. आणि त्यासाठी चॉइस आहेत हत्ती, माकड आणि म्हैस. ही निवडणूक प्रकिया त्यांच्या स्प्राऊटस या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. राष्ट्रीय प्राणी हा देशाचा गौरव असतो. त्याच्या संरक्षणाला सरकार कमी पडलं म्हणून आज ही वेळ आपल्यावर आली आहे. आता तरी सरकारनं या प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा खरोखरच नवा राष्ट्रीय प्राणी निवडण्याची आपल्यावर वेळ येईल.

close