चर्चा फिस्कटली, आडमुठ्या प्राध्यापकांचा संप कायम

April 20, 2013 10:21 AM0 commentsViews: 88

20 एप्रिल

मुंबई : गेले 76 दिवस सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या संपावर आता सोमवारी तोडगा निघण्याची शक्यत्या धुसर झालीय. शुक्रवारी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी प्राध्यापकांच्या संघटनांची बैठक झाली. सरकारनं मात्र या संपावर तोडगा निघाल्याचं जाहीर केलं होतं. पण रात्री उशिरा एमफुक्टोतर्फे ही चर्चा फिस्कटल्याचं जाहीर करण्यात आलं. सरकारानं दिलेली लेखी आश्वासनं कॅबिनेटसमोर अजून मंजूर झालेली नाही. त्यामुळे आम्ही हा संप मागे घेणार नाही असं एमफुक्टोतर्फे स्पष्टं करण्यात आलंय.

याआधी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलेली शिष्टाईसुद्धा संपावर उतारा देण्यात अपयशी ठरली होती. सरकारने प्राध्यापकांच्या थकीत वेतनासाठी 1,500 कोटींची घोषणा केली आहे. मात्र सरकारने लेखी स्वरूपात जोपर्यंत आश्वासन देत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय प्राध्यापकांनी घेतला आहे. या अगोदर प्राध्यापकांच्या प्रमुख मागणी पैकी एक बिगर नेट-सेट आणि पीएचडीधारकांना नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आता मात्र थकीत वेतनासाठी प्राध्यापकांनी संप कायम सुरू ठेवला आहे. तब्बल 76 दिवस सुरू असलेल्या संपामुळे राज्यभरातील विद्यापीठात होणार्‍या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. प्राध्यापकांच्या आडमुठ्या धोरणामुळे मात्र विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

एमफुक्टोचे आरोप

- राजेश टोपे आणि सरकारनं केला अपेक्षाभंग- चर्चेमध्ये केवळ प्रस्ताव, 13 मागण्यांपैकी एकाही मागणीवर निर्णय नाही- प्रस्ताव कॅबिनेटपुढे मंजूर होतील याची खात्री नाही- सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही- 6 व्या वेतनआयोगाच्या थकबाकीलाही मंजुरी दिलेली नाही- बिगर नेटसेट प्रश्नावर शासनाचा निर्णय नाही- आंदोलन मिटण्याची अपेक्षा सरकारनं फोल ठरवली मात्र, सरकार म्हणतंय प्राध्यापक आडमुठेपणा करतायत

close