बंगलोरचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय

April 20, 2013 5:47 PM0 commentsViews: 5

20 एप्रिल

आयपीएलमध्ये आज बंगलोर रॉयल चॅलेंजर्सनं राजस्थान रॉयल्सवर शानदार विजय मिळवला. खराब सुरुवातीनंतरही ख्रिस गेलच्या संयमी बॅटिंगच्या जोरावर आज बंगलोरनं राजस्थानचा 7 विकेटनं पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या राजस्थानची सुरुवात खराब झाली. शेन वॉटसन 6 तर अजिंक्य रहाणे 14 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतले. पण त्यानंतर कॅप्टन राहुल द्रविड आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी फटकेबाजी करत इनिंग सांभाळण्याचा प्रयत्न केला.

पण विनय कुमारनं बिन्नीला आऊट करत ही पार्टनरशिप फोडली. तर मुरली कार्तिकनं द्रविडला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पण यानंतर आलेला एकही बॅट्समन मोठा स्कोर करु शकला नाही. आणि राजस्थाननं बंगलोरसमोर विजयासाठी 118 रन्सचं माफक आव्हान ठेवलं. बंगलोरतर्फे विनय कुमार आणि आर पी सिंगनं प्रत्येकी 3 तर रवी रामपॉलनं 2 विकेट घेतल्या. पण यानंतर चांगल्या सुरुवातीनंतर बंगलोरची इनिंगही गडगडली. दिलशान आणि गेलनं बंगलोरला चांगली सुरुवात करुन दिली खरी पण त्यानंतर वॉटसननं दिलशानला पॅव्हेलियनमध्ये पाठवत बंगलोरला पहिला धक्का दिला. तर कॅप्टन कोहली फक्त 1 रन करु शकला. तर ए बी डिव्हिलीअर्स 7 रन्सवर आऊट झाला. पण यानंतर ख्रिस गेलनं संयमी बॅटिंग करत बंगलोरची इनिंग सावरली. आणि सौरभ तिवारीबरोबर पार्टनरशीप करत बंगलोरला विजय मिळवून दिलाय.

close