दिल्लीत निदर्शनं सुरूच

April 22, 2013 9:32 AM0 commentsViews: 6

22 एप्रिल

नवी दिल्ली : 5 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराविरोधात दिल्लीत आजही तीव्र निदर्शनं सुरू आहेत. दिल्ली पोलीस मुख्यालय, संसदभवन आणि एम्स हॉस्पिटलबाहेर लोक निदर्शनं करत आहे. पोलीस मुख्यालयाजवळ निदर्शकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. तर संसद भवनाजवळ जंतरमंतरवर भाजपच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. गेले सलग तीन दिवस एम्स हॉस्पिटलच्या बाहेर निदर्शनं सुरू आहेत. पीडित मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होतं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

close