एलबीटी विरोधात व्यापार्‍यांनी पुकारला महाराष्ट्र बंद

April 22, 2013 9:37 AM0 commentsViews: 37

22 एप्रिल 13

मुंबई : स्थानिक कर (LBT) ला विरोध करण्यासाठी आज आणि उद्या व्यापार्‍यांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. मुंबई, पुणे आणि ठाणेसह राज्यभरात हा बंद पुकारण्यात आलाय. पुणे शहरात व्यवसाय करणार्‍या 80 टक्के व्यापार्‍यांना रजिस्ट्रेशन करणं, अकाऊंट्स ठेवणं या जंजाळातून वगळावं ही त्यांची मुख्य मागणी आहे. पण ती मागणी अजूनही मान्य झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात केलेल्या निवेदनाचा जी. आर 7 मे पर्यंत जारी करावा, नाही तर 8 मे पासून बेमुदत महाराष्ट्र बंदचा इशाराही व्यापार्‍यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत दिला. यासंबंधी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 7 मे रोजी सुनावणीही होणार आहे.

close