मालेगाव स्फोटातील आरोपींना 6 जानेवारीपर्यंत कोठडी

December 29, 2008 8:55 AM0 commentsViews: 4

29 डिसेंबर, मुंबईमालेगाव स्फोटातल्या सर्व आरोपींना सहा जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मालेगाव स्फोट प्रकरणी आज सर्व आरोपींचा रिमांड होता. त्यांना विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं. या वेळी त्यांच्या कोठडीत 6 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली.साधारण दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणातल आरोपींना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली. या वेळी चौकशीत मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणाबरोबरच इतरही अनेक गुन्हे उघडकीस आले. गेल्या काही वर्षांत देशभरातील अनेक स्फोटात हिंदू दहशतवाद्यांचा हात असल्याचं उघड झालं. या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला असून लवकरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

close