‘त्या’ चिमुरडीच्या प्रकृतीत सुधारणा

April 22, 2013 11:16 AM0 commentsViews: 7

22 एप्रिल

नवी दिल्ली : बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली असून तिची प्रकृती सुधारण्यासाठी आणखी दोन आठवडे लागतील, असं या डॉक्टरांनी सांगितलं आहे. ही मुलगी आता तिच्या आई-वडीलांशी आणि हॉस्पिटलमधल्या नर्सेसशी बोलतीय. तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणातला दुसरा आरोपी प्रदीप याला बिहारच्या दरभंगा येथून अटक करण्यात आलीय. बलात्काराच्या घटनेविरोधात आजही निदर्शनं सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणात दिल्लीच्या पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करावी यासाठी काँग्रेसचा सरकावर दबाव वाढतोय. दरम्यान, या बलात्कार प्रकरणातील आरोपी मनोजकुमारला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. आपण हा बलात्कार केला नसून केवळ तिथे उपस्थित होतो, असं मनोजकुमारचं म्हणणं आहे. तर पोलीस या विधानाची शहानिशा करत आहे. बलात्कार झालेली चिमुरडी आता तिचे आईवडील आणि हॉस्पिटलच्या नर्सेसशी बोलू शकतेय आणि उपचारांना चांगला प्रतिसाद देतीये, असं डॉक्टरांनी सांगितलंय.

close