नागपूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

April 22, 2013 11:31 AM0 commentsViews: 19

22 एप्रिल

नागपूर : राजधानी दिल्लीत चिमुरडीवर बलात्काराची घडना ताजी असतानाच उपराजधानी नागपूरमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली आहे. शहरातील कोतवाली परिसरात एका 4 वर्षीय मुलीवर बलात्कार झालाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे या मुलीच्या मामेभावानं हा बलात्कार केलाय. बलात्कार करणारा मुलगा 17 वर्षांचा आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला तिच्या आईने राजस्थानवरून शिकायला नागपुरमधील आजीच्या घरी पाठवले होतेय. घरी असताना या चिमुरडीवर मामेभावाने बलात्कार केला. या मुलीनं आपल्या आईला रविवारी याबद्दल सांगितल्यावर ही घटना उघड झाली.

close