पीक कर्जासाठी 1 लाख कोटींचा आराखडा तयार -मुख्यमंत्री

April 22, 2013 11:43 AM0 commentsViews: 19

22 एप्रिल

मुंबई : दुष्काळग्रस्त भागातल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वपक्षीय आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत पीक कर्जाबाबत चर्चा झाली. शेती आणि पीक कर्जाची पुनर्रचना करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यासाठी 1 लाख कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कोणताही शेतकरी पतपुरवढ्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पंधरा दुष्काळी जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या कृषी कर्जाचं पुर्नगठन केलं जाणार आहे. यात सात हजार कोटी रुपयांच्या कर्जाचं पुर्नगठन केलं जाणार आहे. यंदा 34 हजार कोटी रुपयांच्या कृषी पतपुरवठ्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

close