एसटीचं खासगीकरण होऊ देणार नाही – राज ठाकरे

December 29, 2008 3:00 PM0 commentsViews: 3

29 डिसेंबर, मुंबईमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य परिवहन कामगार सेनेची स्थापना आज मुंबई सेंट्रल डेपोमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उपस्थित केला. कामगारांसाठी काम करा इतर कामगार संघटनांसारखं करू नका असं यावेळी बोलताना राज ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना सांगितलं. त्याच बरोबर एसटीचं खाजगीकरण करण्याचा डाव आपण यशस्वी होऊ देणार नसल्याचंही ते म्हणाले. "महाराष्ट्रातील जवळपास सगळी गावं एसटीने जोडली गेली आहेत. मात्र मंत्रालयातील काही माणसं एसटीच्या खासगीकरणाचे डाव रचत आहेत. आपलाच एखादा माणूस खासगीकरणासाठी पुढे करायचा, आपलेच पैसे त्याच्या मागे लावायचे आणि मग एसटी घशात घालायची, असा काही लोकांचा मनसुबा आहे. पण माझी संघटना असेपर्यंत मी हे होऊ देणार नाही" असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

close