‘कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा’

April 23, 2013 10:00 AM0 commentsViews: 16

नवी दिल्ली (23 एप्रिल 13): कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी कायदा मंत्रालयानं सीबीआयच्या अहवालात खाडाखोड केल्याच्या मुद्द्यावरून आज संसदेत गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होताच पंतप्रधान आणि कायदामंत्री अश्विनीकुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपसह विरोधी पक्षांनी गदारोळ करायला सुरुवात केली. त्यामुळे काहीच वेळात लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 12 वाजेनंतर लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा पुन्हा एकदा विरोधाकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे लोकसभेचं कामकाज 25 तारखेपर्यंत तहकुब करण्यात आली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्याचा आज दुसरा दिवस आहे. कोळसा खाण वाटप घोटाळा आणि टू-जी स्पेक्ट्रमच्या सीबीआय अहवालावरून विरोधकांनी सरकारला घेरलंय. आज संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. त्यामध्ये पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसनं मात्र ही मागणी फेटाळली आहे.

close