पंजाब नॅशनल बँकेच्या व्याजदरात कपात

December 29, 2008 9:08 AM0 commentsViews: 2

29 डिसेंबरपंजाब नॅशनल बँकेने आपला कर्जांसाठीचा व्याजदर अर्धा टक्का कमी केला आहे. आता कर्जाचा व्याजदर साडे बारा टक्क्यांऐवजी 12 टक्के असेल. पंजाब नॅशनल बँकेची पाच लाखांपर्यंतची कर्ज साडे आठ टक्क्याने मिळतील. पाच ते 20 लाखांची कर्ज सव्वा नऊ टक्क्यांनी मिळतील. फिक्स्ड रेटची हाऊसिंग लोनही पावणे दोन टक्क्यांनी स्वस्त करण्यात आली आहेत. तर डिपॉझिट रेट 1 टक्का कमी करण्यात आला आहे. हे सगळे दर एक जानेवारीपासून लागू होतील.

close