एमपीएससीच्या परीक्षेला आता ‘शनी’ची बाधा

April 23, 2013 12:03 PM0 commentsViews: 11

मुंबई (23 एप्रिल 2013) : एमपीएससीच्या परीक्षेचा सावळागोंधळ सुरूच आहे. एपीएससीची परीक्षा 18 मे रोजी म्हणजे शनिवारी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. पण, परीक्षा शनिवारी ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आतापर्यंत एमपीएससीची परीक्षा रविवारी व्हायची. यावेळी पहिल्यांदाच ती शनिवारी घेण्यात येणार आहे. पण, अनेक विद्यार्थ्यांच्या शनिवारी इतर परीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत परीक्षा 12 मे रोजी घेण्याचं ठरलं असतानाही परीक्षा 18 तारखेला का घेण्यात येतेय, हाही प्रश्नच आहे. एमपीएससीच्या वेबसाईटमध्ये व्हायरस गेल्यानं परीक्षार्थ्यांची माहिती करप्ट झाली होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

close