मनरेगा योजनेचा उडाला बोजवारा, कॅगचा ठपका

April 23, 2013 2:18 PM0 commentsViews: 6

नवी दिल्ली (23 एप्रिल 13):महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा देशभरात बोजवारा उडाल्याचं कॅगच्या अहवालावरून स्पष्ट झालं आहे. कॅगनं आज आपला अहवाल संसदेत सादर केला. त्यानुसार महाराष्ट्र, बिहार, आणि उत्तर प्रदेशानं फक्त 20 टक्के निधी खर्च केला. देशातल्या 46 टक्के ग्रामीण भागातले गरीब या तीन राज्यांमध्ये राहतात. ज्या वर्गासाठी ही योजना आखण्यात आली होती, त्यांना या योजनेचे पूर्ण फायदे मिळाले नसल्याचं स्पष्ट झालंय. मनरेगाअंतर्गत मंजुरी मिळालेल्या कामांपैकी फक्त 30 टक्के कामे पूर्ण झालीत. ही योजना देशातल्या 14 राज्यांमध्ये राबवण्यात येतेय. 2005मध्ये सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत 129 लाख कामांपैकी फक्त 30 टक्के कामे पूर्ण झालीत. 47 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये लाभाथीर्ंना गरजेनुसार काम मिळालं नाही किंवा कामाची मजुरीही मिळाली नाही. तर ग्रामीण भागांमध्ये काम मिळालेल्या घरांची संख्या 54 वरून 43 इतकी कमी झाली आहे.

close