फळबाग निधी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलाच नाही !

April 23, 2013 2:23 PM0 commentsViews: 20

सोलापूर (23 एप्रिल): राज्यात सर्वाधिक फळबाग लागवड सोलापूर जिल्ह्यात आहे. पण यंदाच्या दुष्काळात अनेक बागा नष्ट झाल्या, उर्वरित बागा वाचवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने हेक्टरी 30 हजारांचा मदतनिधी जाहीर करण्यात आला. हा दुष्काळ मदतनिधी 31 मार्चपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणं अपेक्षित होतं. मात्र बागा वाचवण्यासाठीचा निधीच शेतकर्‍यांपर्यंत पोहोचला नाही. दुष्काळ निवारण्यासाठी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ही बाब समोर आलीय. एकट्या सोलापूर जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून आलेल्या 61 कोटींपैकी 50 कोटीचा मदतनिधीचं वाटपच झालं नसल्याची कबुली राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलीय.

close