अकोला जिल्हा परिषदेत भारिप मोठा पक्ष

December 29, 2008 6:31 AM0 commentsViews: 123

29 डिसेंबर अकोलाअकोला जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ 21 जागा जिंकून मोठा पक्ष म्हणून पुढं आला आहे. भारिपला सत्ता मिळू नये यासाठी सेना-भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ग्रामीण विकास आघाडीच्या झेंड्याखाली हे पक्ष एकत्र आले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये एकूण 52 जागा पैकी 21 जागा भारिप बहुजन महासंघाला, 11 जागा शिवसेनेला, 4 जागा भाजपला, 8 जागा काँग्रेसला, 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर अपक्षांना 5 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी शिवसेनेशी युती न करण्याचे संकेत दिले होते. मात्र काँग्रेसचे माजी आमदार लक्षमणराव तायडे यांनीच ही आघाडी स्थापण्यासाठी पुढाकार घेतला. तर स्थानिक प्रश्नांना प्राधान्य असल्याचं सांगत राष्ट्रवादीने आघाडीचं समर्थन केलंय. भारिपला सत्तेपासून दूर ठेवण्यात ही आघाडी यशस्वी ठरली तरी येणा-या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये याच पक्षांना एकमेकांविरोधात लढावं लागणार आहे.

close