मूकबधीर महिलेवर अत्याचार प्रकरणी दोघांना अटक

April 24, 2013 3:44 PM0 commentsViews: 21

24 एप्रिल

नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये एका कर्ण- मूकबधीर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी या महिलेचा पती आणि सासू-सासर्‍यांना अटक करण्यात आली आहे. अमरावतीच्या अनाथ आश्रमात वाढलेल्या या कर्ण-मूक बधीर महिलेचं लग्न सामाजिक संस्थेमार्फेत मुंबईत करण्यात आलं. पण लग्नानंतर या महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आले. या घटनेची माहिती नवी मुंबईतल्या स्त्री सामाजिक संस्थेला मिळाली. या संस्थेनं पुढाकार घेऊन रबाळे पोलीस स्टेशनमध्येतक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या महिलेचा पती, आणि सासू-सासर्‍यांना अटक केली.

close