चीनची दादागिरी, लडाखमध्ये बांधकामावर घेतला आक्षेप

April 24, 2013 4:36 PM0 commentsViews: 52

24 एप्रिल

भारत आणि चीनदरम्यान सीमावाद पुन्हा उफाळलाय. अगोदर चीनच्या हेलिकॉप्टरने भारताच्या हद्दीत घुसखोरी करून आता भारताच्या बांधकामावर चीननं हरकत घेतली आहे. लडाखमध्ये चीन घुसखोरी करत असल्यानं भारतानं तिथं गस्त वाढवली आहे. त्याला चीननं हरकत घेतली आहे. इतकंच नाही, तर लडाखमध्ये भारतानं केलेल्या बांधकामालाही, विशेषतः रस्ते आणि पूल यांना चीननं हरकत घेतली आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भारतानं दोनदा फ्लॅग मीटिंग बोलावली होती. पण या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे भारतानं आता तिसर्‍या बैठकीची तयारी चालवलीय. त्याला चीननं प्रतिसाद दिला नाही. मात्र, हे प्रकरण तितकं गंभीर नाही असं परराष्ट्र मंत्रालयातर्फे दाखवलं जातं आहे.

close