अनामी रॉय यांच्या हकालपट्टीवरून विधानसभेत गदारोळ

December 29, 2008 2:53 PM0 commentsViews: 4

29 डिसेंबर नागपूर नागपूर अधिवेशनात विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांनी राजकुमार अवस्थी प्रकरणा संबंधी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणी अनामी रॉय यांच्यावर न्यायालयाने दाखल असलेल्या केसेसचा उल्लेख करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली.विराधी नेते यांच्या प्रश्नांला उत्तर देताना रॉय यांच्या विरोधातल्या निकालाला न्यायालयानं 6 जानेवारीपर्यंत स्थगिती दिलीय, त्यानंतरच सरकार निर्णय घेईल, असं गृहमंत्री पाटील म्हणाले.राज अवस्थी या तरुणाच्या विरोधात बोगस कागदपत्रे तयार करून एमपीडीएची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु बोगस कागदपत्र बनवल्यामुळे रॉय यांच्यासह 7 पोलीस अधिका-यांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाचे आदेश दिल्यानंतर रॉय किंवा अन्य पोलीस अधिकारी न्यायालयात न जाता राज्य शासन हायकोर्टात गेले. याचाच अर्थ सरकार रॉय आणि इतर अधिका-यांना पाठीशी घालत आहे असा होतो.दरम्यान भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सरकार आणि अनामी रॉय याचे काही लागेबांधे असावेत त्यामुळेच सरकार अनामी रॉय यांना पाठीशी घालत आहे असं म्हटलं आहे.रॉय यांची हकालपट्टी झालीच पाहिजे या मागणीवर विरोधक ठाम आहेत. रॉय यांना एक क्षणभरदेखील पदावर ठेवू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केली.

close