मालेगावात 4 मुलांची हत्या करून दाम्पत्याची आत्महत्या

April 25, 2013 10:07 AM0 commentsViews: 5

25 एप्रिल

मालेगाव: इथं 4 मुलांची हत्या करून एका दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय. शहरातील संगमेश्वरच्या पवननगर परिसरात ही घटना घडली. सुरेश साहू हे हातगाडीवर भांडी विकून गुजराण करत होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुनिता हिनं चार मुलांची गळा दाबून हत्या केली आणि नंतर गळफास लावून दोघांनी आत्महत्या केली. मोठी मुलगी अंकीता 7 वर्षांची होती तर लहानी मुलगी अवघ्या 7 महिन्यांची होती. या भीषण प्रकाराचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. एकाच कुटुंबातील सहा जणांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करत आहे याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

close