राज ठाकरेंचा 2 मे पासून चारा छावणी दौरा

April 25, 2013 10:13 AM0 commentsViews: 43

25 एप्रिल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौर्‍यानंतर आता चारा छावण्यांची पाहणी करणार आहे. 2 मे पासून राज ठाकरे यांचा हा छावणी दौरा सुरू होईल. याकाळात ते मनसेनं स्थापन केलेल्या चारा छावण्यांनाही भेट देणार आहेत. सातार्‍याजवळच्या गोंदवले गावापासून हा दौरा सुरू होतोय. आणि औरंगाबादच्या फुलंब्रीमध्ये या दौर्‍याचा समारोप होईल. राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौर्‍यानंतर दुष्काळी भागात चारा छावण्या आणि पाण्याची सोय करण्याबाबतचा एक कार्यक्रम पक्षातर्फे तयार करण्यात आला होता. या कार्यक्रमाची काय प्रगती आहे हे पाहण्यासाठी हा दौरा असल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलंय.

close