मो.शेखने दिली शेतक-यांना नवी प्रेरणा

December 29, 2008 2:40 PM0 commentsViews: 2

29 डिसेंबर यवतमाळनम्रता शास्त्रकारशेतकरी आणि आत्महत्या असं समीकरणच विदर्भात बनलंय. असं असताना, यवतमाळमधल्या एका शेतक-याने खडकाळ जमिनीत शेती करून दाखवलीय. मोहम्मदच्या इसाक शेख यांनी जाणूनबुजून खडकाळ जमीन विकत घेतली. याला कारण एकच त्यांना दाखवून द्यायचं होतं की, कष्ट केलं तर शेतातून चांगलं पीक काढता येतं.2003 मध्ये त्यांनी खडकाळ जमीन घेतली. पहिली दोन वर्ष तर फक्त दगड फोडण्यातच गेली. त्यामुळे सुरुवातीला लोकांनी त्यांना वेड्यात काढलं.पण तब्बल दोन वर्षाच्या मेहनतीनंतर 16 एकर जमिनीत चांगलं पीक आलं. आज कापूस, चणा , गहू, सोयाबीन, भाजीपाला पिकवून जवळपास 3 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांनी मिळवलंय. ते देखील सरकारकडून कुठलीही मदत न घेता. त्यांचा हा आदर्श इतरांनी घेण्यासारखाच आहे. वणी परिसरात परिवर्तनीय आघाडीचे शेतकरी म्हणून त्यांची गणना होते.मो. इसाक शेख सांगतात, एक नवी प्रेरणा मिळावी यासाठी हा सारा प्रयत्न असल्याचं त्याचं म्हणणं आहे. दगडाला पाझर फुटत नसतो. पण मनगटं दगडासारखी कणखर असतील, मनात चिवट जिद्द असेल, तर खडकाळ जमीनीतही सोनं पिकवता येतं.

close