आज चेन्नई आणि हैदराबादमध्ये मुकाबला

April 25, 2013 11:04 AM0 commentsViews: 5

25 एप्रिल

आयपीएलमध्ये आज पॉईंट टेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या चेन्नई सुपर किंग्जला आव्हान असणार आहे ते पॉइंटटेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर असणार्‍या सनरायजर्स हैदराबादचं… दोन्ही टीमनं 7 पैकी 5 मॅच जिंकत स्पर्धेत आपला दबदबा कायम राखलाय. ही मॅच चेन्नईत रंगणार असल्यानं सध्यातरी चेन्नईचं पारडं जड आहे. चेन्नई शेवटच्या तीन मॅच मोठ्या फरकानं जिंकल्या आहेत आणि आता सलग चौथी मॅच जिंकण्यासाठी ते सज्ज झालेत. पण स्पर्धेत धक्कादायक कामगिरी करत आगेकूच करणार्‍या सनराजयर्स हैदराबादही कमी लेखून चालणार नाही. भेदक बॉलिंगच्या जोरावर सनरायजर्सनं विजय अक्षरश खेचून आणले आहेच. त्यामुळे ही मॅच चेन्नईची बॅटिंग विरुद्ध सनरायजर्सची बॉलिंग अशीच रंगणार आहे.

close