शेतकर्‍यांना फसवून उभारल्या अनधिकृत पवनचक्क्या ?

April 25, 2013 11:32 AM0 commentsViews: 25

25 एप्रिल

कोल्हापूर : येथील शाहूवाडी तालुक्यामध्ये टी.एस.विंडपॉवर कंपनीने अनधिकृतरित्या पवनचक्क्या उभारल्या आहेत. त्यामुळे इथले शेतकरी आता आंदोलन उभारण्याच्या पावित्र्यात आहेत. कंपनीनं दलालांमार्फत अत्यंत कमी किंमतीमध्ये जमिनी विकत घेतल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला.

शाहुवाडी तालुक्यात कोतोली धनगरवाड्यामधली शेतकर्‍यांची जमीन खरेदीपत्रावर फक्त एक एकरचे दाखवून टीएस विंडपावर या कंपनीने खरेदी केलीये. धक्कादायक गोष्ट म्हणजे कंपनीच्या अधिकार्‍यांनी या शेतकर्‍यांना दारू पाजून जमीन घेतल्याचा या शेतकर्‍यांचा आरोप आहे. तसंच कंपनीत रोजगार देण्याचं खोटं आमिषही देण्यात आल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला. शेतकर्‍यांच्या या फसवणुकीवर आता लोकप्रतिनिधीही जागे झालेत. याविरोधात इथले माजी आमदार सत्यजित पाटील कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. एकंदरीतच धनगरवाड्यावरच्या अडाणी शेतकर्‍यांचा फायदा घेऊन कंपनीनं त्यांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. मात्र कंपनीनं यासंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिल्यानं शंकेची पाल जास्तच चुकचुकतेय.

close