निवासी डॉक्टरांकडून काळ्या फिती लावून निषेध

April 25, 2013 1:01 PM0 commentsViews: 10

25 एप्रिल ठाणे : निवासी डॉक्टरांचा संप काही मिटण्याची चिन्ह दिसत नाही. आज ठाण्यातील कळवा रुग्णालयात डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध केला आहे. आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी डॉक्टरांनी केली. निवासी डॉक्टरांना मिळणार्‍या दरमहा स्टायपेंडमध्ये दहा हजार रुपयांची वाढ करावी ही मार्डची मुख्य मागणी आहे. राज्य सरकारने मात्र पाच हजारांची वाढ करण्याची तयारी दाखवली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी 23 एप्रिल पासून राज्यातील सुमारे साडेचार हजार निवासी डॉक्टर संपावर गेल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. मुंबई हायकोर्टाने निवासी डॉक्टरांना कामावर हजर होण्याचा आदेश दिला आहे. मात्र मागण्या मान्य केल्याचे लेखी स्वरुपात कळवा त्यानंतरच कामावर येऊ अशी भूमिका निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने घेतली आहे.

close