कला महाविद्यालयांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

December 29, 2008 10:49 AM0 commentsViews: 5

29 डिसेंबर राज्यातल्या कला महाविद्यालयांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्यात एकूण 235 कला महाविद्यालयं आहेत. त्यापैकी 67 कॉलेजनी तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता घेतलेली आहे. या महाविद्यालयात अभ्यासक्रमही तंत्रशिक्षण मंडळाने आखून दिलेल्या नियमानुसार शिकवला गेला. तसंच इतर कला महाविद्यालयांनी लवकरात लवकर तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता घेण्याची अट घातली गेली होती. मात्र आता ही अट शिथील करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे. ही सगळी कॉलेजेस् पुन्हा एकदा कला संचालनालयाकडे सोपवण्याच्या दृष्टीने घडामोडी घडत आहेत. त्यामुळे नव्या अभ्यासक्रमानुसार शिकलेल्या फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. कारण त्यांना हिस्ट्री ऑफ आर्ट हा विषय न शिकताही त्याची परीक्षा द्यावी लागणार आहे. आता परीक्षेला शेवटचे तीनच महिने शिल्लक राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूपच हाल होणार आहेत.

close