करकरेंविषयी राजनाथांनी सूर बदलला

December 29, 2008 3:41 PM0 commentsViews: 6

29 डिसेंबर मुंबई अमेय तिरोडकरमालेगांव प्रकरणानंतर राजनाथ सिंग यांनी पहिल्यांदाच मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एटीएसचे हेमंत करकरे यांच्याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली. मालेगाव बॉम्बस्फोट तपासावर भाजप नेत्यांनी सातत्यानं एटीएस आणि हेमंत करकरेंना टार्गेट केलं. पण आता भाजपनं भाषा बदलली आहे. मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करताना करकरे यांनी हिंदू दहशतवादाचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. या प्रकरणी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी खुलासा केला की एटीएसवरची टीका करकरेंवर नव्हती तर काँग्रेस सरकारवर होती. बॅ.अंतुले प्रकरणावरून राजनाथनी काँग्रेसवर टीकाही केली होती. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात करकरे शहीद झाले होते. त्यांच्या हौतात्म्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी भाजप अशी खेळी करून मुंबई हल्ल्याचं राजकारण करू पाहत आहे.भाजपला जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ आंदोलनाचा फायदा झाला. येत्या लोकसभेत अशाप्रकारे प्रचार करणार का या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. भारत पाक संबंधांबद्दल आता काँग्रेसने कृती करून दाखवावी असंही ते या पत्रकार परिषदेत म्हणाले.

close