इस्रायलच्या हल्ल्यात 300 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी

December 29, 2008 4:04 PM0 commentsViews:

29 डिसेंबरगाझापट्टीवर इस्रायलचे हवाई हल्ले सलग तिस-या दिवशीही सुरूच आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं इस्रायलला हल्ले थांबवण्याचं आवाहन केलंय. पण, इस्रायलनं मात्र त्याकडं साफ दुर्लक्ष केलंय. सीएनएन-आयबीएनकडे आलेल्या माहितीनुसार इस्रायलली सैन्याच्या शेकडो तुकड्या आणि रणगाडे गाझापट्टीवर पाठवण्यात आल्या आहेत. तसंच जवळपास 6500 राखीव सैनिकांना कामावर बोलावण्यात आलं आहे. हमासनंही इस्रायलच्या दक्षिण भागावर रॉकेट हल्ले सुरूच ठेवले आहेत. भारतानं मात्र इस्रायलच्या हवाई हल्ल्यांचा निषेध केलाय.

close