स्थायी समिती अध्यक्षपदावरून शिवसेनेत बंडखोरी

April 1, 2010 12:39 PM0 commentsViews:

1 एप्रिल

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून शिवसेनेत बंडखोरी झाली आहे.

रवींद्र वायकर यांच्यानंतर आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर राहुल शेवाळेंचे नाव निश्चित झाले आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या चेंबूरच्या नगरसेविका मंगला काते या नाराज आहेत.

त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्तांकडे सादर केला होता.

पण पक्षाकडून त्यांची समजूत घालण्यात आल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. पण त्यांची नाराजी कायम आहे.

close