नाईट रायडर्सचा मुकाबला डेक्कन चार्जर्सशी

April 1, 2010 12:50 PM0 commentsViews: 1

1 एप्रिल

आयपीएलमध्ये आज डेक्कन चार्जर्सचा मुकाबला असेल तो कोलकाता नाईट रायडर्सशी.

आयपीएलच्या तिसर्‍या हंगामाची सुरुवात या दोन टीममधल्या मॅचने झाली होती. आणि यात नाईट रायडर्सने बाजी मारली होती.

आता पुन्हा एकदा या दोन टीम आमने सामने येतील. पण यावेळी कोलकाता टीमच्या होम ग्राऊंडवर म्हणजे कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर.

दोन्ही टीमचा या स्पर्धेतील प्रवास जवळपास सारखाच आहे. दोन्ही टीमच्या खात्यात 3 विजयांचा समावेश आहे आणि पॉईंट टेबलमध्ये आघाडी घेण्याची दोन्ही टीमला समान संधी आहे.

डेक्कन चार्जर्सच्या टीममध्ये गिलख्रिस्ट, सायमंड, हर्षेल गिब्ज आणि रोहित शर्मा असे भक्कम बॅट्समन आहेत. तर नाईट रायडर्सची मदार असेल ती ख्रिस गेल, सौरव गांगुली, ओवेश शहा आणि एंजेलो मॅथ्यूज यांच्यावर.

ही मॅच कोलकात्यात रंगणार असल्याने घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबाही नाईट रायडर्सला मिळणार आहे. पॉईंट टेबलमध्ये आघाडी घेण्याची दोन्ही टीमला संधी आहे.

close