नाशिकमध्ये सुर्वे कला दालन

April 1, 2010 3:22 PM0 commentsViews: 3

1 एप्रिल

कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृती जपण्यासाठी नाशिकमध्ये नारायण सुर्वे कलादालन उभारण्यात आले आहे.

यात सुर्वे यांना आतापर्यंत मिळालेले सर्व पुरस्कार मांडण्यात आले आहेत. साहित्यिकांना मिळणारे पुरस्कार, स्मृतीचिन्हे त्यांच्या घरीच राहातात.

मात्र या निमित्ताने पुरस्कार देणार्‍या संस्थांचे काम लोकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने सुर्वे यांनी ही सर्व स्मृतीचिन्हे आणि मानपत्रे येथील नारायण सुर्वे वाचनालयाला दिली होती.

ती वाचनालयात बंदिस्त न ठेवता, लोकांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने या कलादालनात ठेवण्यात आली आहेत.

close