पतसंस्था ठेवीदारांना धमकी

April 1, 2010 3:34 PM0 commentsViews: 3

1 एप्रिल

पतसंस्थेतल्या ठेवी परत मागणार्‍या ठेवीदाराला पैशांऐवजी धमकीचे फोन येत आहेत.

धुळ्यातील कन्हैयालाल नागरी पतसंस्थेत मयूर अलई यांच्या कुटुंबाच्या 7 लाख रुपयांच्या ठेवी आहेत.

संचालक मंडळ बरखास्त झाल्यावर, त्यावर नेमण्यात आलेल्या प्रशासकाने अलईकडे पैसे परत देण्यासाठी लाच मागितली.

अलई कुटुंबाने ऍण्टी करप्शन खात्याकडे तक्रार करून प्रशासक प्रकाश भामरे यांना रंगेहात पकडून दिले.

तरी सहकार विभागाने अजून भामरे यांच्यावर कारवाई केलेली नाही.

अलईंना त्यांचे पैसे तर अद्याप मिळालेले नाहीत, उलट आता, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.

close