राज्याच्या पर्यावरणाचा होणार अभ्यास

April 1, 2010 3:43 PM0 commentsViews: 6

1 एप्रिल

राज्य सरकार आता बदलत्या वातावरणाबद्दल गंभीर झाल्याचे दिसत आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यात काय समस्या उदभवू शकतात आणि ते कमी कसे करावे याचा अभ्यास आता होणार आहे.

राज्याच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी सरकारने टेरी संस्थेसोबत बुधवारी एक करार केला.

त्यानुसार टेरी राज्यातील पर्यावरणाचा, पाणी प्रश्नाचा, शेतीचा, किनारपट्टीचा अभ्यास करुन दोन वर्षात कृती अराखडा तयार करणार आहे.

भविष्यात राज्य सरकारच्या पॉलिसी या कृती आराखड्यावर अवलंबून असणार आहेत.

close