रोल बॉल स्केटिंग स्पर्धेत जळगावचा अमन चमकला

December 29, 2008 3:59 PM0 commentsViews: 3

29 डिसेंबर, जळगावअजय पालीवालकेरळ इथं नुकत्याच झालेल्या रोल बॉल स्केटिंग स्पर्धेत जळगावच्या चोपडा गावात रहाणा-या अमन मॅथ्यूने बाजी मारली आहे. आठवीत शिकणारा अमन मॅथ्यू शाळेच्या हॉलमधे प्रॅक्टीस करतोय.कारण या गावांत स्केटिंग रिंगच नाही.राज्य रोलबॉल स्पर्धेत अमननं जळगांव संघाला ब्रॉंझ मेडल मिळवून दिलं आणि त्यामुळेच केरळ इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याची महाराष्ट्र टीममध्ये निवड झाली.आपल्या उपजत कौशल्यानं खेळतांना अमननं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही.शाळेचा व्हरांडा किंवा घराची गच्ची हि त्याची प्रॅक्टीसची जागा.असं असतानाही चमक दाखवणा-या अमनला योग्य प्रशिक्षण मिळालं तर तो नक्कीच देशाचं नाव उंचावेल, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. असे अनेक होतकरू खेळाडू देशामध्येआहेत. क्रीडा संघटनांनी पुढाकार घेतला तर देशाची क्रिडा क्षेत्रांतील कामगिरी नक्कीच उंचावू शकेल.

close