पोलिसांच्या गोळीबारात गुंड ठार

April 1, 2010 3:48 PM0 commentsViews: 5

1 एप्रिल

खंडणीसाठी आलेले गुंड आणि पोलिसांत झालेल्या चकमकीत आज नालासोपार्‍यात एक गुंड ठार झाला. रॉबीन अरोरा असे ठार झालेल्या गुंडाचे नाव आहे. तो पांडवपुत्र गँगमधील होता.

वसई जवळच्या नालासोपार्‍यातील अलकापुरी विभागात पांडवपुत्र गँगचे काहीजण खंडणी साठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

ही माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. पण या गुंडानी पोलिसांवरच गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये रॉबीन आरोरा या गुंडाचा मृत्यू झाला. एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

गोळीबारात जखमी झालेल्या रॉबीनला जवळच्याच अलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर मुंबईत खंडणी, खून यांसारख्या गुन्ह्यांचीही नोंद आहे.

close