पुण्यात सामूहिक बलात्कार

April 2, 2010 8:23 AM0 commentsViews: 45

2 एप्रिल

पुण्यातील वाकड भागात एका महिलेवर सामूहिक बलात्कराची घटना घडली आहे.

एमबीए झालेली ही महिला नागपूरची असून ती इंटरव्ह्यूसाठी पुण्यात आली होती.

हिंजवडी भागातून तिने शेअर टॅक्सी केली. या टॅक्सीत अगोदरच तिघे बसलेले होते. त्यांनीच या महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला.

या प्रकरणी रात्री बाराच्या सुमारास या महिलेने हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले.

रणजीत शहाजी गाडे, आणि गणेश उत्तम कांबळे अशी त्यांची नावे आहेत.

तर सुभाष हिरालाल भोसले हा संशयीत फरारी आहे

close