एनएमएमटी चालकांचा नवी मुंबईतील संप मिटला

December 29, 2008 7:03 AM0 commentsViews: 2

29 डिसेंबर, मुंबईनवी मुंबईत एनएमएमटी चालकांनी अचानक संप पुकारला होता. ड्र्‌ायव्हरला मारहाण केल्याच्या निषेध म्हणून,हा संप पुकारण्यात आला होता.बस चालकांनी रस्त्यावरचं गाड्या थांबवल्या होत्या.जवळपास चाळीस ते पन्नास गाड्या रस्त्यावर थांबवण्यात आल्या होत्या पण आता हा संप मिटला आहे.आज सकाळी एनएमएमटीच्या एका ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली. यानंतर बसड्रायव्हरनी अचानक संप पुकारला. बसेस होत्या त्या जागी उभ्या करण्यात आल्या. बसमधल्या प्रवाशांना आहे त्या जागी उतरवण्यात आलं. हा संप पुकारल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या मार्गावर प्रवासासाठी अन्य साधन उपलब्ध नसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. साधआरण पाच तास हा संप चालला. नंतर पोलिसांच्या तसंच प्रशासनाच्या मध्यस्थीने हा संप मिटवण्यात यश आलं.

close