युवराजने फोडले मीडियावर खापर

April 2, 2010 10:07 AM0 commentsViews: 3

2 एप्रिल

संगकारासोबत मतभेद असल्याच्या बातम्यांचे युवराज सिंगने खंडन केले आहे. तसेच आपण किंग्ज इलेव्हन पंजाब टीम सोडणार होतो, ही बातमीही चुकीची असल्याचे युवराजने म्हटले आहे.

युवराज सिंगला किंग्ज इलेव्हन पंजाब टीम सोडायची होती, अशा बातम्या मीडियात आल्यानंतर युवराजने आपले मौन सोडले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने संगकाराला कॅप्टन करण्याचा निर्णय घेतला.

त्याच वेळी युवराजने नेस वाडियाला भेटून, टीम सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशा बातम्या मीडीयामध्ये आल्या होत्या.

आयपीएल-3 मध्ये आतापर्यंत युवराजची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. गेल्या सात मॅचेसमध्ये युवराजने फक्त 101 रन्स केलेत. कॅप्टन संगकारा आणि त्यांच्यातील बेबनावाचा परिणाम युवराजच्या कामगिरीवर झाल्याचे बोलले जात आहे.

close