सरबजीतचा ‘ब्रेन डेड’, प्रकृती नाजूक

April 30, 2013 8:55 AM0 commentsViews: 60

30 एप्रिल

लाहोर : पाकिस्तानमध्ये कैदेत असलेले भारतीय कैदी सरबजीत सिंग अजूनही कोमात आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरबजीत सिंगचं ब्रेनडेड झालं असून त्याला वाचवण्याची शक्यता मावळलीय अशी माहिती मिळाली. सरबजीतला व्हेंटिलेटर वरून काढायाचं की नाही याचा निर्णय चर्चा करून घेण्यात येणार आहे. सरबजीत सिंग यांची बहिण दलबीर कौर भारतात परतणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

मागिल आठवड्यात शुक्रवारी लाहोरमधल्या कोट लखपत तुरुंगात दोन कैद्यांनी कैद्यानं विटा आणि प्लेट्सनं त्यांना बेदम मारहाण केली. यात सरबजीत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो कोमात गेला होता. त्याची प्रकृती स्थिर झाल्याशिवाय त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करता येणार नाही, असं परराष्ट्र खात्यामार्फत सांगण्यात स्पष्ट करण्यात आलं होतं. सरबजीतची बहिण दलबीर कौर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

सरबजीतला उपचारासाठी भारतात पाठवावं, अशी अधिकृत मागणी भारतानं पाकिस्तान सरकारकडे केलीय. पण, पाकिस्तानातल्या डॉक्टरांनी ही मागणी फेटाळलीये. सरबजीतच्या हल्लेखोरांना शिक्षा करण्याची मागणीही परराष्ट्र खात्यानं पाकिस्तानकडं केली आहे.

close