कर्नाटक निवडणुकीत शिवसेनेचा एकीकरण समितीला पाठिंबा

April 30, 2013 9:08 AM0 commentsViews: 7

30 एप्रिल

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. येत्या 5 मे रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक होतेय. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे चार उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेने ही निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होतं. मात्र मराठी मतांच विभाजन टाळण्यासाठी शिवसेनेनं एकीकरण समिताच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. बेऴगाव दक्षिण या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे हनमंत मजूकर यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र तो अर्ज मार्ग घेण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत.

close