अखेर ‘त्या’ चिमुरडीची मृत्यूशी झुंज अपयशी

April 30, 2013 9:37 AM0 commentsViews: 13

30 एप्रिल

नागपूरमध्ये उपचार सुरू असलेल्या चार वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीची अखेर प्राणज्योत मालवली. गेल्या 12 दिवसांपासून ही मुलगी मृत्यूशी झुंज देत होती. केअर हॉस्पिटलमध्ये काल रात्री तिचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातल्या सिवनी जिल्ह्यातल्या घनसौर तालुक्यात 17 एप्रिलला या 4 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर तिला स्मशानभूमीत फेकून देण्यात आलं होतं. तिला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं होतं. पण, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही तिला वाचवण्यात अपयश आलं. तिचा मृतदेह मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

close